रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST2021-03-19T04:16:26+5:302021-03-19T04:16:26+5:30

वाहतूककोंडी जळगाव : टॉवर चौकात नियमित वाहतूककोंडी होत आहे. गुरुवारीही वाहतूककोंडीचा प्रश्न कायम होता. बऱ्याच वेळा चारही बाजूने वाहनांची ...

Road condition | रस्त्याची दुरवस्था

रस्त्याची दुरवस्था

वाहतूककोंडी

जळगाव : टॉवर चौकात नियमित वाहतूककोंडी होत आहे. गुरुवारीही वाहतूककोंडीचा प्रश्न कायम होता. बऱ्याच वेळा चारही बाजूने वाहनांची वर्दळ होत असल्याने अपघताचा धोकाही या ठिकाणी असतो. अनेक वेळा वाहतूक पोलीस असतात, मात्र अनेक वेळा वाहतूक पोलीस नसल्याने चारही बाजूंनी एकाच वेळी वाहनांची गर्दी होत असते.

२४४० जणांना लस

जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी २४४० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. एकूण ७४,७२४ लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर १०,५४५ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. गुरुवारी ४३५ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण केंद्र वाढवून लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

मृत्युदर दोन टक्क्यांच्या खाली

जळगाव : जिल्ह्याचा मृत्युदर हा १.९७ टक्क्यांवर आला आहे. मात्र, दुसरीकडे एका दिवसात होणारे बाधितांचे मृत्यू मात्र वाढले आहेत. बुधवारी एकाच दिवसात ७ बाधितांचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा मृत्युदर हा २.०९ टक्के होता. तो घटून दोन टक्क्यांच्या खाली नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Road condition