आर.एम. पाटील यांच्या नियुक्तीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:35+5:302021-07-15T04:13:35+5:30

जळगाव : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक म्हणून नियुक्ती झालेल्या आर.एम. पाटील यांच्या नियुक्तीची चौकशी करा, अशी मागणी छावा ...

R.M. Investigate Patil's appointment | आर.एम. पाटील यांच्या नियुक्तीची चौकशी करा

आर.एम. पाटील यांच्या नियुक्तीची चौकशी करा

जळगाव : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक म्हणून नियुक्ती झालेल्या आर.एम. पाटील यांच्या नियुक्तीची चौकशी करा, अशी मागणी छावा मराठा युवा महासंघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. आर.एम. पाटील यांच्याकडे जिल्ह्यासह मनपाचादेखील कार्यभार देण्यात आला असून, त्यांची मागची कारकीर्द विवादास्पद असून, त्यांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यासाठी काही बिल्डरकडून मोठा खर्च करण्यात आल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

केंद्राच्या निधीतील कामांची स्थिती चांगली

जळगाव - देशभरात २०१४ ते १९ या पाच वर्षांत खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती जळगावात आली होती. या समितीने शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत विचारणा करत केंद्राच्या निधीतील रस्त्यांची स्थिती समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, समितीने खासदार निधीतील केलेली कामे किती लोकांच्या उपयोगाची आहेत, याची माहिती घेत अहवाल केंद्राकडे सादर केला.

सुरत रेल्वेगेटवर वाहतूक कोंडी

जळगाव : शहरातील दूध फेडरेशनजवळील सुरत रेल्वे गेटजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. एकाच वेळी दोन रेल्वे या गेटवरून क्रॉस झाल्यामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात मालवाहतूक करणारे वाहनेदेखील याठिकाणी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी वाढतच गेली. तब्बल दीड तास या ठिकाणची वाहतूक खोळंबली होती.

२४ हॉकर्सवर कारवाई

जळगाव : शहरातील फुले मार्केट भागात हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घातली असताना, याठिकाणी हॉकर्सने पुन्हा दुकाने थाटल्यामुळे बुधवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून २४ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व हॉकर्सदरम्यान वाददेखील निर्माण झाला.

केळीवर कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले असून, अनेक भागात केळीवर कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपीक असून, सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग आहे. दरवर्षी, जुलै ते सप्टेंबरदरम्यान या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे २/३ वेळा चार ते पाच दिवसांनी नियमित निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही विल्हेवाट लावावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: R.M. Investigate Patil's appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.