आर.के. पाटील व गोपाळ पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST2021-09-02T04:33:31+5:302021-09-02T04:33:31+5:30
कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी ही नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. ...

आर.के. पाटील व गोपाळ पाटील यांची निवड
कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी ही नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्याची मागणी
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकरी बांधवांना तत्काळ मदत देण्यात यावी, तसेच अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेल्वेतील २३ कर्मचारी सेवानिवृत्त
जळगाव : भुसावळ रेल्वे विभागातील २३ कर्मचारी ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात डीआरएम एस.एस. केडीया, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा यांच्यासह एन.डी. गांगुर्डे, बी.एस. रामटेके, दिलीप खरात आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यशस्वितेसाठी विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या नेपानगरला थांब्यांच्या मुदतीत वाढ
जळगाव : मुंबईकडून जळगावमार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस(गाडी क्रमांक ०२५३७-३८) या गाडीच्या नेपानगर या स्टेशनवरील थांबा ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय थांबली आहे.