महाराष्ट्रीयन टी १० क्रिकेट संघाच्या कर्णधारीपदी रिजवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST2021-04-01T04:17:25+5:302021-04-01T04:17:25+5:30

शजळगाव : महाराष्ट्र टी १० असोसिएशनतर्फे महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रीयन संघाचे ...

Rizwan as captain of Maharashtrian T10 cricket team | महाराष्ट्रीयन टी १० क्रिकेट संघाच्या कर्णधारीपदी रिजवान

महाराष्ट्रीयन टी १० क्रिकेट संघाच्या कर्णधारीपदी रिजवान

शजळगाव : महाराष्ट्र टी १० असोसिएशनतर्फे महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रीयन संघाचे नेतृत्व पाचोरा येथील रिझवान पठाण हा करणार आहे. चार एप्रिल पासून या स्पर्धेचे सामने दिल्ली आणि ग्रेटर नोएडा येथे होणार आहेत.

या स्पर्धेत एकूण पंधरा सामने दिवस रात्र खेळले जाणार आहे. या लीग सामन्यांमध्ये महाराष्ट्र बरोबर दिल्ली, पूर्वांचल, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर ,येथील संघाचा सहभाग आहे.

महाराष्ट्रीयन टी १० संघ पुढील प्रमाणे, रिझवान पठाण (कर्णधार), आकाश गौतील, इश्क शेख,मिथिलेश गुनेरिया ,दिनेश यादव ,डेव्हिड सहारे ,विकी रेवातकर,दीपक ठकराण, गुरुप्रीत सिंघ,विश्वेश्वर सिंघ,गुरुप्रीत गिल,अन्वर संकेत, सुरेश हर्षल ,इमरान अली, अनमोल दिव्यकृष्णा, प्रशिक्षक - जयकुमार बोराडे

Web Title: Rizwan as captain of Maharashtrian T10 cricket team