जळगावात आरटीओ एजंटकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 18:47 IST2017-03-26T18:47:02+5:302017-03-26T18:47:02+5:30
आरटीओ एजंटच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 15 हजारांच्या रोकडसह बॅटरी व किरकोळ साहित्य चोरुन नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

जळगावात आरटीओ एजंटकडे घरफोडी
15 हजाराच्या रोकडसह किरकोळ साहित्य लंपास
जळगाव, दि.26- कुटुंबातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपले असताना मोहाडी रस्त्यावरील मोहन नगरात काशिनाथ देविदास बाविस्कर या आरटीओ एजंटच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 15 हजारांच्या रोकडसह बॅटरी व किरकोळ साहित्य चोरुन नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन नगरात बाविस्कर हे प}ी जयश्री व मुलगी भाग्यश्री यांच्यासोबत राहतात. 12 मार्च रोजी बाविस्कर हे रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जेवण आटोपून तळघराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर प}ी व मुलीसोबत झोपण्यासाठी गेले. दुस:या दिवशी पहाटे 4 वाजता नळांना पाणी आल्यामुळे प}ी जयश्री या पाणी भरण्यासाठी खाली आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लागलीच पती काशिनाथ बाविस्कर यांना हा प्रकार सांगितला. दोघांनी घरात जावून पाहणी केली असता घरातील 15 हजार रुपयांची रोकड व बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. पंधरा दिवसानंतर बाविस्कर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.