शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 08:44 IST

जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे.

मुंबई/जळगाव - मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाच्या शुभारंभाचा कार्यक्रम पाडला. त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील खेडी येथे उभारण्यात येणार असलेल्या भव्य 'वारकरी भवना'चे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. उत्तरम महाराष्ट्रातील हे पहिलेच एवढे मोठे वारकरी भवन असून पंढरीच्या वारीसाठी विठु-माऊलीच्या दर्शनाची आस घेऊन वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या भवनच्या माध्यमातून हक्काचं निवासस्थान उपलब्ध होत आहे.

जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे. राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा असून तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, त्यातील किर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मंरण करुन समाज प्रबोधनाचे काम करत आहे. उत्तर महाराष्ट्रात ५५ एकरावर हे पहिलेच 'वारकरी भवन' उभारले जात असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६ कोटी ६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे वारकरी भवन पूर्ण होईपर्यंत त्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.      पंढरपुरचा विकास होत असतांना राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांचाही विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची तरतुद केल्याची माहितीही यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिली. 

दरम्यान, पंढरीच्या वारीसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला मोठी गर्दी होत असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्तजण पंढरपुरात दाखल होतात. लाखोंच्या संख्येने हे वारकरी पायी वारी करत इथे पोहोचतात. वाटेत अनेक ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. तर, अनेक मानाच्या पालख्या घेऊनही वारकरी संस्था पंढरीकडे येत असतात. जळगावमधून संत मुक्ताबाईंची पालखी हजारो वारकरी भक्तांच्या सोबतीने पंढरीत येत असते. आता, याच जळगाव जिल्ह्यातील खेडमध्ये उभारण्यात येत असलेले हे वारकरी भवन भक्तांसाठी उत्तम सोय म्हणून सेवेत दाखल होईल.  

 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगावvarkariवारकरीPandharpurपंढरपूर