माहिती अधिकारात माहिती देणे टाळणे भोवले; सेवानिवृत्त उपकुलसचिवांना अडीच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:16 IST2021-03-26T04:16:27+5:302021-03-26T04:16:27+5:30

जळगाव : माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सेवानिवृत्त उपकुलसचिव व सध्या एमआयटी, ...

The right to information; Retired Deputy Registrar fined Rs | माहिती अधिकारात माहिती देणे टाळणे भोवले; सेवानिवृत्त उपकुलसचिवांना अडीच हजारांचा दंड

माहिती अधिकारात माहिती देणे टाळणे भोवले; सेवानिवृत्त उपकुलसचिवांना अडीच हजारांचा दंड

जळगाव : माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सेवानिवृत्त उपकुलसचिव व सध्या एमआयटी, पुणे येथील परीक्षा नियंत्रक ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण यांना माहिती आयुक्त माहिती आयोग यांनी दोन हजार पाचशे रुपयांचा दंड केला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी संजय सपकाळे यांनी त्यांच्या कालबद्ध पदोन्नतीबाबत नेमलेल्या डॉ. राजेंद्र कांकरिया समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे मागितला होता. परंतु, विद्यापीठ प्रशासनाकडे संबंधित अहवाल असताना नस्ती सापडत नाही, असे उत्तर संजय सपकाळे यांना दिले जात होते. त्यामुळे सपकाळे यांनी विद्यापीठाचे तत्कालीन माहिती अधिकारी ज्ञानदेव नीलवर्ण यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागितली. ही माहिती देण्यास नीलवर्ण यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर ही माहिती तत्कालीन प्रथम अपील अधिकारी डॉ. अंबालाल चौधरी यांच्याकडे मागितली पण त्यांनीही सदर माहिती देण्याबाबत आदेश दिले नाहीत. अखेर माहिती न मिळाल्यामुळे सपकाळे यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव त्यांनी माहिती आयुक्त, नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील सादर केले. सुनावणीवेळी ज्ञानदेव नीलवर्ण यांनी मी आता सेवानिवृत्त आहे व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, असा लेखी युक्तिवाद केला, मात्र तो माहिती आयोगाने अमान्य केला. तत्कालीन उपकुलसचिव तथा माहिती अधिकारी ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५मधील अधिनियम २० (१)नुसार दोन हजार पाचशे रुपयांची शास्तीची कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयोग, नाशिक यांनी दिले आहेत. तसेच प्रथम अपिलीय अधिकारी तथा कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र् विद्यापीठ यांनी तत्कालीन जनमाहिती अधिकारी नीलवर्ण यांच्या वेतनातून समान २ मासिक हप्त्यात कपात करून भरणा करण्याबाबत कळविले आहे.

Web Title: The right to information; Retired Deputy Registrar fined Rs