महामार्गावर धावत्या रिक्षाने अचानक घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST2021-04-02T04:15:48+5:302021-04-02T04:15:48+5:30

फोटो : ३.३८ वाजेचा सागर दुबे नावाचा मेल आहे. .. लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी ...

A rickshaw running on the highway suddenly took a beating | महामार्गावर धावत्या रिक्षाने अचानक घेतला पेट

महामार्गावर धावत्या रिक्षाने अचानक घेतला पेट

फोटो : ३.३८ वाजेचा सागर दुबे नावाचा मेल आहे. ..

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाजवळील पेट्रोल पंपासमोर अचानक धावत्या रिक्षाने पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र, आगीत रिक्षा जळून खाकी झाली.

बुधवारी सकाळी प्रवासी घेऊन एक रिक्षा जळगावकडून पाळधीच्या दिशेने जात होती. विद्यापीठाच्या काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरून ही रिक्षा जात असताना तिने अचानक पेट घेतला. हा प्रकार रिक्षा चालक व प्रवाश्यांना कळताच, त्यांनी रिक्षातून बाहेर उडी घेतली. नंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ विद्यापीठात संपर्क साधून अग्निशमन बंब बोलविले. यावेळी विद्यापीठाचे सुरक्षा सुपरवायझर दिलीप पाटील, विजय बोरसे, कोमल सोनवणे व मंथाराम राठोड हे बंब घेऊन काही क्षणात घटनास्थळी पोहोचले.

रिक्षाचे नुकसान : वाहतूक ठप्प

रिक्षाने पेट घेतल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले होते. परिणामी, क्षणात रिक्षा जळून खाक झाली. विद्यापीठाच्या अग्शिमन बंबाच्या मदतीने रिक्षावर पाण्‍याचा मारा करीत आग नियंत्रणात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाळधी पोलीस ठाण्‍यातील पोलीस अधिकारीसुध्‍दा घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या घटनेमुळे काही वेळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Web Title: A rickshaw running on the highway suddenly took a beating