रेल्वे रूळ ओलांडताना रिक्षाचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST2021-01-18T04:14:28+5:302021-01-18T04:14:28+5:30

सतीश कोळी हे मूळचे कानळदा येथील रहिवासी होते. रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. महिनाभरापूर्वीच ते पाळधी येथे राहण्यास ...

Rickshaw puller dies while crossing railway line | रेल्वे रूळ ओलांडताना रिक्षाचालकाचा मृत्यू

रेल्वे रूळ ओलांडताना रिक्षाचालकाचा मृत्यू

सतीश कोळी हे मूळचे कानळदा येथील रहिवासी होते. रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. महिनाभरापूर्वीच ते पाळधी येथे राहण्यास आले होते. रविवारी दुपारी शेतीकामासाठी रेल्वे रूळ ओलांडून जात असताना रेल्वेच्या धडकेत ते जागीच गतप्राण झाले. पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन व किरण सपकाळे यांनी घटनास्थळ गाठले. मयताच्या खिशातील दुचाकीच्या परवान्यावर कानळदा असे गावाचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कानळदा येथील ग्रामस्थांशी संपर्क साधून नातेवाइकांना माहिती दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. सतीश कोळी यांच्या पश्चात लहान भाऊ जगदीश कोळी, पत्नी प्रतिभा , मुलगा गौरव व तीन विवाहित मुली राणी, प्रियंका व हर्षा असा परिवार आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Rickshaw puller dies while crossing railway line