जळगावात ट्रकच्या धडकेत रिक्षातील प्रवाशी गंभीर जखमी
By Admin | Updated: June 26, 2017 17:10 IST2017-06-26T17:10:51+5:302017-06-26T17:10:51+5:30
इच्छादेवी चौकाजवळील अपघात. संतप्त जमाव धावला ट्रक चालकाच्या अंगावर

जळगावात ट्रकच्या धडकेत रिक्षातील प्रवाशी गंभीर जखमी
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26- धान्य घेऊन जाणा:या ट्रकची रिक्षाला डाव्या बाजूने धडक बसल्याने त्यात रवींद्र राजाराम जोशी (वय 27 रा.संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) या तरुणाचा पाय व एक हात फ्रॅर झाला. हा अपघात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता महामार्गावर इच्छादेवी चौक परिसरात झाला. जखमी तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त जमाव ट्रक चालकाच्या अंगावर धावून गेला.
प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा (एम.एच.19 वाय.8895) बिलाल चौकाकडून सिंधी कॉलनीकडे जात होती. या रिक्षात रवींद्र जोशी हे मागे डाव्या बाजूने बसलेले होते. तर इच्छादेवी चौकाकडून धान्य घेऊन सावदा येथे जाणारा ट्रक (एम.एच.19 ङोड.4295) वेअर हाऊसजवळ आला असता रिक्षाच्या अगदी जवळून गेल्याने रिक्षातील रवींद्र जोशी या तरुणाच्या पायाला व हाताला जबर धडक बसली.
या अपघातात जखमी रवींद्रची स्थिती पाहता परिसरातून लोक धावतच आले. त्यांनी व रिक्षातील अन्य प्रवाशांनी ट्रक चालकाला मारहाण करण्याचा प्रय} केला. रवींद्रच्या शरीरातून रक्तप्रवाह थांबतच नव्हता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला त्याच रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.