रिक्षा उलटून कासमवाडीतील महिला जागीच ठार
By Admin | Updated: June 24, 2017 13:38 IST2017-06-24T13:38:44+5:302017-06-24T13:38:44+5:30
नशिराबादजवळ महामार्गावरील घटना : बाजारात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असताना झाला अपघात

रिक्षा उलटून कासमवाडीतील महिला जागीच ठार
ऑनलाईन लोकमत
जळगाव/नशिराबाद : जळगावहून नशिराबाद येथे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी भाडय़ाची रिक्षा करून जात असताना नशिराबादजवळील चौबे पेट्रोलपंपाजवळ रिक्षा उलटल्याने सिंधुबाई किसन गायकवाड (वय 50) रा़ कासमवाडी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2़45 वाजेच्या सुमारास घडली़
भाजी विक्रीचा व्यवसाय
सिंधुबाई यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आह़े त्यांचे पती किसन गायकवाड एका टाईल्सच्या दुकानावर कामाला आहेत़ सिंधुबाई या मुलगा ज्ञानेश्वरसह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात़
शुक्रवारी सायंकाळी नशिराबाद येथील बाजार असल्याने सिंधुबाई मुलगा ज्ञानेश्वरसह भाडय़ाच्या रिक्षाने (एम एच 19 बी़एम़3274)ने नशिराबाद येथे जात होत्या. चौबे पेट्रोलपंपाजवळ समोरून येणा:या दुचाकीस्वाराला (एम़एच 19 ए़टी़166) वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल़े यात रिक्षा उलटल्याने डोक्याला मार लागून सिंधुबाई यांचा जागीच मृत्यू झाला़ रिक्षाचालक रामेश्वर भगवान महाजन व ज्ञानेश्वर गायकवाड यांना किरकोळ दुखापत झाली़