शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावनजीक महामार्गावर रिक्षा उलटली; यावलचे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:12 IST

अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला कट मारल्याने रिक्षा महामार्गावर उलटली

ठळक मुद्देपाच प्रवासी जखमी अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा दाखल

नशिराबाद, जि. जळगाव : भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला कट मारल्याने रिक्षा महामार्गावर उलटली. त्यात पती-पत्नी ठार झाले तर रिक्षातील अन्य पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना नशिराबादनजीक महामार्गावर खिर्डी शिवारात पाटील नर्सरीजवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.शर्मिला उर्फ प्रमिला सुभाष चौधरी (५०) व सुभाष निवृत्ती चौधरी (५५) (रा.यावल, धनगरवाडा) असे मृतांचे नाव आहे. हे दोघे डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. घरी जाण्यासाठी रिक्षा स्टॉपवर आले. रिक्षा (क्रमांक एम.एच.१९-बी.जे. ६०३७) भुसावळकडे जाण्यासाठी प्रवासी घेवून निघाली. मागून भरधाव वेगात येणा-या अज्ञात चारचाकी वाहनाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार कट मारल्याने रिक्षा उलटली. त्यातील प्रवासी बाहेर फेकले गेले. शर्मिला उर्फ प्रमीला सुुभाष चौधरी यांचा जागी मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, राजेंद्र साळुंखे, युनुस शेख, चेतन पाटील, नामदेव ठाकरे, आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले.रिक्षा चालक मुकुंद सुभाष गिरनारे (३५, रा. वांजोळा, भुसावळ), नजमाबी सैयद कमरोद्दीन (६०, बामणोद), अबीदाबी शेख रशीद (वय ६५, रा. साकेगाव), कमला पोपट चौधरी (वय ६५, रा.तुकारामनगर भुसावळ), तुळसाबाई पुंडलिक वारके (वय ६५, रा.भुसावळ) गंभीर जखमी आहे. जखमींवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहे. रिक्षा चालक मुकुंदा गिरनारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव