वळणावर भरधाव रिक्षा उलटून प्रवासी ठार
By Admin | Updated: April 1, 2017 12:02 IST2017-04-01T12:02:35+5:302017-04-01T12:02:35+5:30
हा अपघात शुक्रवारी रात्री 11.30 वाजता झाला.

वळणावर भरधाव रिक्षा उलटून प्रवासी ठार
सावदा, जि. जळगाव, दि. 1- भरधाव वेगाने जाणारी रिक्षा वळणावर उलटून झालेल्या अपघातात ज्ञानेश्वर लहानू महाजन (55, रा. रावेर, जि. जळगाव) हे ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री 11.30 वाजता झाला. वाघोदा येथून रावेर येथे जाणारी रिक्षा (क्र. एच.एच. 19, बीजे- 8417) एका मोठय़ा वळणावर उलटली. या रिक्षामध्ये चालकासह केवळ महाजन हे एकमेव प्रवासी होते. यात महाजन हे ठार झाले तर चालकाला किरकोळ दुखापत झाली.