मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम

By Admin | Updated: September 30, 2015 23:52 IST2015-09-30T23:52:06+5:302015-09-30T23:52:06+5:30

नंदुरबार : मतदार याद्यांचे 1 नोव्हेंबर 2015 च्या अर्हता दिनांकावर आधारित पुनरीक्षणाचा कार्यक्रम महिनाभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.

Revision program of voter lists | मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम

मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम

नंदुरबार : सर्वसाधारण मतदारयाद्या व पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे 1 नोव्हेंबर 2015 च्या अर्हता दिनांकावर आधारित पुनरीक्षणाचा कार्यक्रम महिनाभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी. बोलत होते. निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थवील उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले, या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 8 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर, ग्रामसभांमध्ये वाचन 14 ऑक्टोबर, विशेष मोहिमेचा दिनांक 11, 18 ऑक्टोबर, दावे व हरकती निकालात काढण्याचा दिनांक 30 नोव्हेंबर, डाटा अद्ययावत करण्याची मुदत 24 डिसेंबर व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक 16 जानेवारी राहणार आहे. मतदारसंघनिहाय मदत केंद्रे संबंधित तहसील कार्यालयात उभारण्यात आले आहेत.

निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये अक्कलकुवा मतदारसंघात 12 हजार 137, शहादा मतदारसंघात 14 हजार 556, नंदुरबार मतदारसंघात चार हजार 36, तर नवापूर मतदारसंघात चार हजार 569 असे एकूण 35 हजार 298 मतदार वगळण्यात आले आहेत.

Web Title: Revision program of voter lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.