सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:59+5:302020-12-04T04:41:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉनकोविड सुविधा सुरू झाल्यानंतर नेमकी सुरक्षा व्यवस्था कशी ठेवायची ...

सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉनकोविड सुविधा सुरू झाल्यानंतर नेमकी सुरक्षा व्यवस्था कशी ठेवायची याबाबत स्थापन सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. समितीचे प्रमुख म्हणून डॉ. इमरान पठाण यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या समितीची पहिलीच बैठक कोविड रुग्णालयात बुधवारी सायंकाळी पार पडली. नॉनकोविड झाल्यानंतर विनापास कोणत्याही रुग्णाच्या नातेवाइकाला आत प्रवेश करता येणार नाही. रुग्णांना कक्षामध्ये कसे दाखल करावे, या स्थितीपासून नियोजन करण्यात येणार आहे. एजंटला रोखण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था अत्यंत सतर्क असून, त्यांच्या ड्रेसकोडवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नॉनकोविडसाठी पाहणी
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी नॉनकोविडसाठी कक्षांची पाहणी केली. दरम्यान, संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशीही याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. लवकरच नॉनकोविडची सुविधा सुरू होणार असल्याची माहिती आहे.