भाजप अनुसूचित जाती मोर्चाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:02+5:302021-09-04T04:21:02+5:30
जळगाव : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या नाशिक विभागीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजप अनुसूचित जाती मोर्चाची ...

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची आढावा बैठक
जळगाव : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या नाशिक विभागीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजप अनुसूचित जाती मोर्चाची आढावा बैठक झाली. यामध्ये दौऱ्याचे नियोजन करण्यात आले.
ब्राम्हण सभा सभागृहात झालेल्या या बैठकीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्ह्यात बळकट करण्यासाठी व प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांचा नाशिक विभागीय दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा पदाधिकारी, अनुसुचित जाती मोर्चा सर्व मंडळाध्यक्षांनी प्रयत्न करावे. अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समर्थ बूथ संपर्क अभियान व संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, सुबोध वाघमारे, प्रफुल्ल जवरे, अनंत नन्नवरे, धनराज बाविस्कर, मिलिंद भैसे, प्रमोद वानखेडे, विलास अवसरमल, राहुल तायडे, अमोल घोडे, प्रा.विलास भालेराव, अभिषेक मोरे, दिलीप सुरवाडे, रवींद्र दाभाडे, दीपक बोरोले, निखील सावळे, दीपक सोनवणे, राजेंद्र सवळे, दीपक सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, धर्मराज बागुल, विजय जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी केले तर नागेश्वर साळवे यांनी आभार मानले. भाजप जिल्हा कार्यालय प्रमुख गणेश माळी यांनी परिश्रम घेतले.