मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमळनेरात 9 रोजी आढावा बैठक

By Admin | Updated: May 31, 2017 12:18 IST2017-05-31T12:18:37+5:302017-05-31T12:18:37+5:30

पूर्व तयारी म्हणून अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली.

A review meeting on 9th in the presence of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमळनेरात 9 रोजी आढावा बैठक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमळनेरात 9 रोजी आढावा बैठक

ऑनलाइन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 30 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  9 जून रोजी अमळनेर येथे जिल्हा आढावा बैठक होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली  उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली. तसेच विविध स्थळांची पाहणी करण्यात आली.
जलयुक्त शिवाराची सर्वाधिक कामे अमळनेरात झाल्याने मुख्यमंत्री  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत व इतर योजनांचा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी 9 जून  रोजी अमळनेरात येण्याची शक्यता आहे.  या पाश्र्वभूमीवर बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी हजर होते. त्यात जलयुक्तची 100 टक्के कामे पूर्ण करणे, मागेल त्याला शेततळे, कृषी पंपांना वीज जोडणी, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व नागरी योजनेचा आढावा, प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज पुनर्गठनाचा आढावा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेण्यात आला.
तसेच मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर उतरविण्यात येणार आहे.   मुख्यमंत्री मारवड येथील माळण नदी, सडावण चाकवे येथील नाला खोलीकरण व नगाव येथील शेततळे आदींची पाहणी करणार असल्याची शक्यता असल्याने, अधिका:यांनी त्याठिकाणी पहाणी केली.  या बैठकीस उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, कार्यकारी अभियंता एस.एन.वाघ, वीज मंडळाचे उपकार्यकारी  अभियंता मनोज पवार, कार्यकारी  अभियंता आर.के.नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय सोनवणे, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, लघुसिंचनचे उपविभागीय अधिकारी एस.एच.पाटील, तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील, संजय चौधरी, पोलीस निरीक्षक विकास वाघ, व्ही.बी.पाटील उपस्थित होते.
 

Web Title: A review meeting on 9th in the presence of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.