जळगाव शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळ महिला समितीतर्फे स्नेहमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:52+5:302021-02-05T05:53:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळा महिला समितीतर्फे संक्रांतीनिमित्त तीळगुळ समारंभ, हळदीकुंकू व स्नेहमिलनाचा कार्यक्रम उत्साहात ...

Reunion on behalf of Jalgaon Shukla Yajurvediya Brahmin Mandal Mahila Samiti | जळगाव शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळ महिला समितीतर्फे स्नेहमिलन

जळगाव शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळ महिला समितीतर्फे स्नेहमिलन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळा महिला समितीतर्फे संक्रांतीनिमित्त तीळगुळ समारंभ, हळदीकुंकू व स्नेहमिलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रास्ताविक मंडळाच्या उपाध्यक्षा मीनाक्षी जोशी यांनी केले. मंडळाच्या सदस्या सुवासिनी देवळ यांनी संक्रांत सणानिमित्त असणारे हळदी कुंकू या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. रेवती याज्ञिक यांनी महिलांचे दैनंदिन जीवनात याेगासन व प्रणायाम याचे महत्व उपस्थित महिलांना सांगितले. यानंतर तीळगुळ व हळदी कुंकू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शीतल जोशी, विजया कुलकर्णी, अपूर्वा पाठक, हर्षाली मुळे, सरिता भट, रेखा जोशी, रेखा कुलकर्णी, नेहा भट, तिलोत्तमा धर्माधिकारी, हर्षा पाठक, कांचन याज्ञिक, अविता जोशी यांचेसह बहुसंख्या महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी तर आभार उपाध्यक्षा मीनाक्षी जोशी यांनी मानले.

Web Title: Reunion on behalf of Jalgaon Shukla Yajurvediya Brahmin Mandal Mahila Samiti