जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदल्यांबाबत 16 फेब्रुवारी रोजी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:13 IST2018-01-12T13:13:17+5:302018-01-12T13:13:32+5:30

मॅट न्यायालयात युक्तीवाद

On the return of District Surgeon on 16th February | जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदल्यांबाबत 16 फेब्रुवारी रोजी निकाल

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदल्यांबाबत 16 फेब्रुवारी रोजी निकाल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12- आरोग्य मंत्रालयाने मुदतपूर्व किंवा नियमबाह्य केलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदल्यांबाबत मॅट न्यायालयात 11 जानेवारी रोजी युक्तीवाद झाला.  16 फेब्रुवारी रोजी याचा निकाल दिला जाणार आहे. 
 आरोग्य मंत्रालयाने एकाच वेळी जळगाव, धुळे, अहमदनगर व अन्य काही जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात अहमदनगर, धुळे व जळगाव येथील शल्य चिकित्सकांच्या बदल्या या मुदतीपूर्व झाल्या होत्या. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील शल्यचिकित्सकांनी मॅट न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निकाल देतांना मॅट न्यायालयाने शासनाने केलेल्या बदल्या ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. यामध्ये जळगावच्या बाबतीत 11 जानेवारी रोजी कामकाज होणार होते. त्यानुसार आज न्यायालयात युक्तीवाद झाला.
आता 16 जानेवारी रोजी या बाबत निकाल दिला जाणार आहे. 
दरम्यान, या बाबत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही तर विद्यमान शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत पुढील तारीख दिल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: On the return of District Surgeon on 16th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.