सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने भुसावळमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 21:29 IST2020-03-28T21:24:06+5:302020-03-28T21:29:19+5:30
भुसावळ : येथील फिल्टर हाऊस जवळील एक रहिवासी व सेवानिवृत्त लोको पायलट रेल्वे कर्मचारी आॅस्ट्रेलिया व पुण्यावरून आल्यानंतर कोरोना ...

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने भुसावळमध्ये खळबळ
भुसावळ : येथील फिल्टर हाऊस जवळील एक रहिवासी व सेवानिवृत्त लोको पायलट रेल्वे कर्मचारी आॅस्ट्रेलिया व पुण्यावरून आल्यानंतर कोरोना संशयित लक्षणांमुळे त्याचा मृत्यू झाल्याने भुसावळमध्ये मध्ये खळबळ उडाली आहे.
२७ रोजी रात्री या कर्गचाºयास खूपच त्रास झाल्यामुळे रेल्वे हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच मृत्यू ओढवला. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांना सर्दी खोकला अशी लक्षणे होती तसेच शेळके यांना हृदय विकाराची, डायबेटीसची समस्या होती त्यांचा मुलगा आॅस्ट्रेलिया येथे राहतो व मुलगी जळगाव येथे. काही दिवसांपूर्वी ते आॅस्ट्रेलिया येथे जाऊन आले व नंतर ते पुणे येथे गेले होते. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयित लक्षणे असल्यामुळे भुसावळ मध्ये एकच खळबळ उडाली असून भुसावळ रेल्वे हॉस्पिटलला दक्षता म्हणून संपूर्ण पणे सॅनेटराईज करण्यात आले आहे. तसेच हे शव जळगाव येथे सामान्य रुग्णालय येथे विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यू नेमका कशाने झाला हे समजणार आहे.