पारोळा, जि.जळगाव : येथील किसान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार आत्माराम रामचंद्र पाटील (६७) यांनी आजारपणाला कंटाळून हॉटेल ग्रीन पार्क समोरील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६:३० वाजता घडली.किसान महाविद्यालयाचे सेवा निवृत्त रजिस्ट्रार व साने गुरुजी कॉलनीतील रहिवाशी आत्माराम रामचंद्र पाटील(६७) हे कंबर आणि गुडघे दुखीच्या आजाराने त्रस्त होते. गेल्यावर्षी एका मोटारसायकलस्वाराने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांची शस्रक्रिया झाल्याने त्यांचे फिरणे बंद झाले होते.गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते घरातून कोणाला काहीएक न सांगता बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने मुलगा संदेश व राजू यांनी वडिलांचा शोध घेतला. हॉटेल ग्रीन पार्क समोर असलेल्या विहीरी जवळ चप्पल व काठी आढळून आली. या साहित्याची ओळख पटल्यानंतर भय्या चौधरी, कौस्तुभ सोनवणे व इतर युवकांनी विहिरीतून आत्माराम पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. वडिलांचा मृतदेह पाहून मुलांनी व एकच हंबरडा फोडला . त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पारोळा येथे सेवानिवृत्त रजिस्ट्रारची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:13 IST
पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार आत्माराम रामचंद्र पाटील (६७) यांनी आजारपणाला कंटाळून हॉटेल ग्रीन पार्क समोरील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६:३० वाजता घडली.
पारोळा येथे सेवानिवृत्त रजिस्ट्रारची आत्महत्या
ठळक मुद्देआजारपणाला कंटाळून केली आत्महत्याराष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विहिरीत केली आत्महत्याविहिरीजवळील चप्पल व काठीवरून झाला घटनेचा उलगडा