शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त फौजदार घरात असताना लांबविली ४८ हजाराची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:08 IST

मुक्ताईनगरातील घटना : ७० हजार सुरक्षित; मोलकरणीवर संशय

जळगाव : सेवानिवृत्त फौजदार गॅलरीत मोबाईलवर बोलण्यात गुंग तर पत्नी बाथरुममध्ये असताना घरकामासाठी असलेल्या महिलेने तिजोरीचे कुलुप उघडून ४८ हजाराची रोकडसह चावी लांबविल्याचा प्रकार मुक्ताईनगरात उघडकीस आला. विशेष म्हणजे ही रक्कम चोरुन नेताना तिजोरीत ठेवलेले ७० हजार रुपये जसेच्या तसे आहेत. याप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरातील गट क्र.३२ मध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भगवान विश्राम पाटील (५८) हे पत्नी सीमा पाटील यांच्यासह वास्तव्याला आहेत. मोठा मुलगा कपील पाटील पुणे येथे डॉक्टर तर लहान मुलगा स्वप्नील हा ठाणे येथे महानगरपालिकेत नोकरीला आहे. मुलगी वैशाली हिचे लग्न झालेले आहे, ती पतीसह ठाणे येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे घरी भगवान पाटील व सीमा पाटील असे दोघंच असतात. घरकामासाठी त्यांनी कल्पना मिस्तरी ही महिला लावलेली आहे. शुक्रवारी सकाळी भगवान पाटील गॅलरीत मोबाईल बोलत होते तर पत्नी बाथरुममध्ये होत्या. कल्पना ही घरात काम करीत होती. यावेळी कल्पना हिने शोकेसमध्ये ठेवलेली तिजोरीची चाबी घेऊन त्यातील दोन हजार रुपयांच्या २४ नोटा असे ४८ हजार रुपये काढून घेतले तर शंभर रुपये दराचे ७० हजाराचे सात बंडल जसेच्या तसे राहू दिले. सोबत जाताना तिजोरीचीही चावी घेऊन गेली.संध्याकाळी फुटली बोंबसंध्याकाळी भगवान पाटील यांना पैशाची गरज भासली असता तेथे चाव्या नव्हत्या. त्यामुळे इतर साहित्याचा वापर करुन तिजोरी उघडली असता चोरीचा प्रकार लक्षात आला. दरम्यान, तिघांशिवाय घरात दुसरा कोणीच व्यक्ती नव्हती किंवा बोहरुनही आलेली नाही.त्यामुळे ही चोरी कल्पना मिस्तरी हिनेच केल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केला असून तिच्याच नावाने पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव