शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, कामगार संघटनेच्या बैठकीत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 23:23 IST

भारतीय कामगार संघटनेची राज्यव्यापी बैठक पत्रकार भवनात झाली. १५ ते २० वर्षापासून राज्यात रोजंदारीने कर्मचारी काम करीत आहेत.

जळगाव : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे तसेच वर्ग ३ व वर्ग ४ च्या नवीन पदांची निर्मीती करुन त्याला मान्यता द्यावी, असे दोन महत्वपूर्ण ठराव शनिवारी जळगावात झालेल्या भारतीय कामगार संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय कामगार संघटनेची राज्यव्यापी बैठक पत्रकार भवनात झाली. १५ ते २० वर्षापासून राज्यात रोजंदारीने कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी अर्थात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रधान सचिव, महामंडळाचे संचालक यांच्याकडे वारंवार लेखी निवेदने देण्यात आली आहे.रिक्त व नव्याने निर्माण केलेल्या पदांची बिंदू नामावली करुन त्यानुसार रोजंदारी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसर सेवेत कायम केल्यास महामंडळाला अनुभवी कर्मचारी मिळतील, असेही सोनवणे यांचे म्हणणे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन नन्नवरे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जहांगीर खान, महामंडळाचे विभागीय अध्यक्ष राहूल बिऱ्हाडे, अर्जुन मोरे, मोहन बिऱ्हाडे, कपील जाधव, शेनफडू सोनवणे, दीपक सोनवणे व विमल मोरे उपस्थित होते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव