निकाल तर लागला, पण गुणपत्रक महाविद्यालयांना पोहोचली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:45+5:302021-09-09T04:22:45+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निकाल जलद गतीने लावली गेली, पण महाविद्यालयापर्यंत निकालांच्या प्रती अद्यापपर्यंत पोहोचलेल्या ...

निकाल तर लागला, पण गुणपत्रक महाविद्यालयांना पोहोचली नाही
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निकाल जलद गतीने लावली गेली, पण महाविद्यालयापर्यंत निकालांच्या प्रती अद्यापपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परिणामी, तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे तत्काळ निकालांच्या प्रती महाविद्यालयांना पाठविण्यात याव्या, अशी मागणी एनएसयूआयच्या वतीने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक किशोर पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. नुकतेच पदवीच्या तृतीय वर्षाचे निकालही जाहीर झाले आहे. मात्र, निकालपत्र अद्याप महाविद्यालयापर्यंत पोहोचलेले नाही. त्यातच निकालपत्र मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेटही मिळू शकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यापीठाने महाविद्यालयांना निकाल पत्रक पाठवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत निकालपत्रक मिळतील व संबंधित महाविद्यालयातून लवकरात लवकर ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतील, अशी ग्वाही परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांकडून देण्यात आली. निवेदन देताना प्रदेश सचिव एनएसयूआयचे चेतन बाविस्कर, घनश्याम पाटील, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.