उत्तम आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:07+5:302021-04-09T04:16:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विश्रांती आवश्यक असते आणि विश्रांती म्हणजे केवळ झोप नसून ...

उत्तम आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विश्रांती आवश्यक असते आणि विश्रांती म्हणजे केवळ झोप नसून मेंदूला विविध प्रयत्नाच्या माध्यमातून विश्रांत करणे आवश्यक आहे. त्यासाठी संगीत ऐकणे, आपला छंद जोपासणे, ध्यान करणे, निवांत बसून आपल्या विचारांचे मंथन करणे, आवडत्या व्यक्तीसोबत, नातेवाइकासोबत मन मोकळे करणे. या सर्व बाबी आपल्याला तणावमुक्त करण्यासाठी निश्चितच मदत करतात, असे प्रतिपादन विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कम्युनिटी कॉलेजच्या प्राचार्या शैलजा पप्पू यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथीद्वारे बुधवारी जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. देवानंद सोनार यांनी प्रास्ताविका केले. सूत्रसंचालन निसर्गोपचार तज्ज्ञ समन्वयक प्रा. सोनल महाजन यांनी केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रा. डॉ. सं.ना. भारंबे, निसर्गोपचार तज्ज्ञ समन्वयक प्रा. अनंत महाजन, प्रा. ज्योती वाघ, प्रा. गीतांजली भंगाळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी १०८ महिला पुरुषांनी नोंदणी करून ८५ आरोग्यप्रेमी महिला-पुरुषांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला होता.