महिला संपादक मंडळाने सांभाळली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:45 IST2019-03-08T12:44:51+5:302019-03-08T12:45:02+5:30

जळगाव : आज ८ मार्च . सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या हॅलो पानाच्या ...

The responsibility of the women's editorial board is the responsibility | महिला संपादक मंडळाने सांभाळली जबाबदारी

महिला संपादक मंडळाने सांभाळली जबाबदारी


जळगाव : आज ८ मार्च . सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या हॅलो पानाच्या ‘महिला दिन’ अंकाचे संपादन महिलांनी केले. यासाठी विविध क्षेत्रातील कर्तत्ववान महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. या महिलांची गुरुवारी सकाळी लोकमत शहर कार्यालयात बैठक झाली. यात बातम्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली. निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी या आगळया- वेगळ्या उपक्रमामागील भूमिका मांडली. यातून महिलांचा सन्मान करण्याची ‘लोकमत’ची भूमिका आहे. यावेळी संपादक मंडळाच्या झालेल्या बैठकीत महापौर सीमा भोळे यांच्यासह अन्नपूर्णा बनसोडे, स्वाती पात्रा, मंजुषा पवनीकर, सिस्टर ज्युलेट अब्राहम, राजश्री डोलारे, सपना श्रीवास्तव, नीता कायटे, विजेतासिंग, डॉ.विशाखा पाटील, मोना तडवी, शिल्पा गाडगीळ, डॉ.नीलमा सेठीया व सुप्रिया राणे सहभागी झाले होते.

Web Title: The responsibility of the women's editorial board is the responsibility