सुधा काळे व पुष्पा पाटील यांचेही जबाब
By Admin | Updated: September 24, 2015 00:55 IST2015-09-24T00:55:56+5:302015-09-24T00:55:56+5:30
जळगाव : नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर व विमानतळ योजनेच्या दाखल गुन्ह्यात बुधवारी सुधा काळे , पुष्पा पाटील व तत्कालिन लिपिक रफीक शेख यांचे जबाब नोंदविले.

सुधा काळे व पुष्पा पाटील यांचेही जबाब
जळगाव : नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर व विमानतळ योजनेच्या दाखल गुन्ह्यात बुधवारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी माजी नगराध्यक्ष सुधा पांडुरंग उर्फ बंडू काळे , पुष्पा प्रकाश पाटील व तत्कालिन लिपिक रफीक शेख यांचे जबाब नोंदविले. दरम्यान, पाच गुन्ह्यांमधील जिल्हा बॅँकेशी निगडित 50 टक्के तर नगरपालिकेशी निगडित 90 टक्के माहिती प्राप्त झाल्याचे ठाकुर यांनी सांगितले. दररोज पाच ते सहा जणांना बोलावण्यात येत आहे. त्यात बरेच जण साक्षीदार आहेत तर काही जणांकडून माहिती घेतली जात आहे. मात्र प्रत्यक्षात ब:यांचा जणांचा यात सहभागही नाही, परंतु तपासात त्रुटी राहू नये यासाठी अशा लोकांना पाचारण केले जाते. ज्यांनी ठराव, प्रोसिडींगवर सह्या केल्या आहेत किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आढळून आलेला आहे, त्यांचेच जबाब नोंदविले जात आहेत. यात तपासाअंती काय निष्पन्न होईल, हे मात्र आताच सांगता येणार नसल्याचे ठाकुर यांनी स्पष्ट केले. जिल्हा बॅँकेच्या पाच गुन्ह्यातील भूकंप ट्रस्ट व स्टार्च फॅक्टरी हे दोन्ही प्रकल्प बंद पडल्याने तपासात अडचणी येत आहेत. गुजरातमध्ये भूकंपग्रस्तांना 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मात्र ही मदत करताना ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला न देता थेट भूकंप सहायता निधीला देण्यात आली आहे. त्यामुळे बॅँकेला असे अधिकार आहेत का? याची चौकशी केली जात आहे.