शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

कलेच्या रंगात रंगला बहिणाबार्इंचा जीवनपट, नशिराबाद येथे राज्य चित्रकला शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:44 IST

राज्यातील २० चित्रकारांचा सहभाग

ठळक मुद्देपुरातन नाईकवाड्यात होतेय शिबिरपुरातन काळाच्या स्मृतींना उजाळा

प्रसाद धर्माधिकारी / आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जि. जळगाव, दि. ७ - : राज्यस्तरीय चित्रकला शिबिरात निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जीवनपट चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून विविध रंगाचा आविष्कार सादर करून बहिणाबार्इंना अभिवादन केले.नशिराबादच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य चित्रकला शिबिरात सर्वच रंगाच्या रंगविश्वात रंगून गेले होते. कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार रंगछटा उमटवित होते. कलाविष्कार पाहण्यासाठी जिल्हावासी गर्दी करीत आहेत.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ असा ऐतिहासिक नामकरणाचा निर्णय झाला आहे, त्यानिमित्त अजिंठारेषेचे धनी कलाशिक्षक स्व.पी.जी.कुमावत यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय चित्रकला शिबिर घेण्यात येत आहे.राज्यातील २० चित्रकार सहभागीचार दिवस हे शिबिर होणार आहे. त्यात राज्यातील चित्रकार विविध रंगछटांच्या माध्यमातून कवयित्री बहिणाबार्इंच्या कार्याचा जीवनपट रंगवित आहे. त्यात राज्यातील सुमारे २० चित्रकार सहभागी झाले आहेत.शिबिराचे उद्घाटन मालतीकांत पुरुषोत्तम नारखेडे यांच्या हस्ते दीप प्रज्वालनाने झाले.यावेळी प्रताप कुमावत, जि.प.सदस्य लालचंद पाटील, सरपंच विकास पाटील, प्राचार्य राजेंद्र महाजन, इच्छाराम नाईक, कलावंत रघु नेवरे (नागपूर), माजी सरपंच पंकज महाजन, किशोर पाटील, शाम कुमावत, सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे, डॉ.प्रमोद आमोदकर, सुरेश अकोले आदींच्या हस्ते नटराज पूजन झाले. शिबिर घेण्याबाबतचा उद्देश शाम कुमावत यांनी व्यक्त केला.नशिराबादसारख्या ग्रामीण भागात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय शिबिरास प्रतिसाद मिळत असून राज्यातील विविध भागातील चित्रकार ग्रामीण भागात होत असलेल्या या शिबिरात सहभागी झाले आहेत.पुरातन नाईकवाड्यात होतेय शिबिरनाईक वाड्यात सुमारे दोन शतकाच्या पुरातन लाकडी इमारतीत हे शिबिर भरविण्यात आले आहे. त्यामुळे शिबिरास वेगळेपण प्राप्त झाले असून पुरातन काळाच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.या चित्रकारांचा सहभागनाईक वाड्यात होत असलेल्या राष्ट्रीय चित्रकला शिबिरात चित्रकार रघु नेवरे (नागपूर), अमित काला (जयपूर), राजेश पाटील (इंदौर), वंदना परगनिया (नागपूर), राजेंद्र महाजन (चोपडा), विरेन आनंद (नागपूर), अरविंद बडगुजर (भुसावळ), मिलिंद विचारे (जळगाव), राजू बाविस्कर (जळगाव), जितेंद्र सुरळकर (पीसुर्वो) मुंबई, विकास मल्हारा (जळगाव), शाम कुमावत (नशिराबाद), विजय जैन (जळगाव), मनोज जंजाळकर (जळगाव), हारुन पटेल (जळगाव), प्रताप कुमावत (नशिराबाद), निरंजन शेलार (जळगाव), सचिन मुसळे, योगेश सुतार (जळगाव) हे चित्रकार शिबिरात सहभागी झाले आहेत.मी मॉडर्न आर्टिस्ट आहे. कवयित्री बहिणाबार्इंचा जीवनपट कलेच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळाली. आतापर्यंत देशात व परदेशातील ९ ठिकाणी चित्र रेखाटले आहे. नशिराबादच्या जुने नावानुसार १६ दरवाजे व बहिणाबार्इंची चित्र काढले आहे. -जितेंद्र सुरळकर (पीसुर्वो)जयपूरचे महत्व अगाध असले तरी कला एक सारखी नाही. बहिणाबार्इंच्या कवितेतून रंगछटा मांडण्याचा प्रयत्न आहे. कला हीच कविता व स्पंदन आहे. कला ही चैतन्यदायी आहे.-अमित काला, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्तआधुनिकतेमुळे माणूसकी तुटत असली तरी ती कलेच्या माध्यमातून जिवंत आहे. आजपर्यंत मी चित्र रेखाटण्यात विदेशी रंगच वापरले. भारतीय रंगात दर्जा नसल्याची खंत आहे. -रघु नेवरे, नागपूरमाणसाला माणूसपण मिळावे या उद्देशातून चित्र रेखाटत आहे. बहिणाबार्इंचे योगदान मोठे आहे. कलेतून त्यांना अभिवादन करीत आहे.-प्रा.राजेंद्र महाजन, चोपडानैसर्गिक रंगाला अनन्य महत्व आहे. त्यामुळे कलेला जिवंतपणा मिळतो. चित्र काढण्याचे माध्यम बदलले मात्र कला तीच आहे. -हरुण पटेल, जळगावलहानपणापासून कलेचे बाळकडू मिळाले. गावाचा लौकीक देशभरात व्हावा व कलेचा प्रसार होण्यासाठी शिबिर होत आहे. घराण्याचा वारसा अबाधित रहावा या उद्देशाने वडिलांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय शिबिर घेतले आहे. राज्यातील कलाकारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादाने हे शिबिर सार्थकी झाले आहे. -शाम कुमावत, नशिराबाद कलाशिक्षक व आयोजक

टॅग्स :Jalgaonजळगाव