सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:16+5:302021-06-11T04:12:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हिंदू सम्राट महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करीत असताना निर्माता, निर्देशक, ...

सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हिंदू सम्राट महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करीत असताना निर्माता, निर्देशक, लेखकाने या चित्रपटाला योग्य तथा सन्मानपूर्वक नाव दिलेले नाही. तर महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. या चित्रपटाला ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’असे नाव देऊन इतिहास योग्यरित्या मांडण्यात यावा, अशी मागणी श्री राजपूत करणी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील व जिल्हा प्रमुख विठ्ठलसिंग मोरे यांच्या स्वाक्ष-या आहेत. निवेदन देताना खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आशिष हाडा, बी.एच.खंडाळकर, जिल्हा संघटक गणेश दरबारसिंग राजपूत, युवकचे खान्देश विभागीय अध्यक्ष बापूसिंह राणा, युवकचे जिल्हाध्यक्ष रंजनसिंह राजपूत, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल राजपूत, महिला अध्यक्ष आशा राजपूत, जळगाव शहर प्रमुख अतुलसिंह राजपूत, शहर संघटक ज्ञानेश्वर राजपूत आदी उपस्थित होते.