अपघातात मदत करणाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:01+5:302021-06-16T04:23:01+5:30
गत आठवड्यात ९ जून रोजी कारचा भीषण अपघात झाला होता. यात जखमी सचिन काकरवाल यांना वाचवण्यासाठी ...

अपघातात मदत करणाऱ्यांचा सत्कार
गत आठवड्यात ९ जून रोजी कारचा भीषण अपघात झाला होता. यात जखमी सचिन काकरवाल यांना वाचवण्यासाठी काही जणांनी मदतकार्य केले. गाडीचा पत्रा कापून दीड तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. यामुळे एक परिवाराला वाचविता आले. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मदतकार्य करणाऱ्यांचा सन्मान केला. यात ग्रामपंचायत सदस्य गयासुद्दीन तडवी, फिरोज तडवी, शिवराज देशमुख, जमील शेख, तौफिक शेख, राजू तडवी, रवी सोमनाथ यांच्यासह नागरिकांचा समावेश आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे व ॲड. संजय पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.