शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

काँग्रेस मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:43 PM

डॉ.उल्हास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असून, सत्तेचा वापर करून ते जिल्ह्यात दहशत माजवत आहे. लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून बाहेर काढून व जामनेरमध्ये गिरीश महाजनांचा पराभव करून त्यांच्या दहशतीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा संकल्प मंगळवारी शहरातील लेवा भवन येथे झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.रावेर लोकसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यापूर्र्वी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे कॉँग्रेस व राष्टÑवादीचा मेळावा झाला. मेळाव्यात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कॉँग्रेसच्या जिल्हा प्रभारी हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अरुण पाटील, कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, राष्टÑवादीचे निरीक्षक करण खलासे, पीपीपीचे जगन सोनवणे, यांच्यासह कॉँग्रेस व राष्टÑवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.आता जर आपला पराभव झाला तर भविष्यात उमेदवार मिळणार नाही - डॉ.सतीश पाटीलरावेरची जागा कॉँग्रेस तर जळगावची जागा राष्टÑवादीकडे आली असून, दोन्ही पक्षाने एकमेकांसाठी काम करणे गरजेचे आहे. कारण या निवडणुकीत जर आपला पराभव झाला तर भविष्यात भाजपा विरोधात लढण्यासाठी आपल्याला उमेदवार मिळणार नाही, असे मत राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच दोन्ही जागा जिंकून गिरीश महाजनांची झोप उडवून द्या, असेही आवाहन त्यांनी केले.खडसे - महाजनांनी काय काम केले? - रवींद्र पाटीलगिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यात एकही विकासाचे काम केले नाही, केवळ थापा मारल्या. बोदवडला १५-१५ दिवस पाणी पुरवठा होत नाही. डॉ.उल्हास पाटील यांनी निवडून आल्यानंतर बोदवडचा पाणी प्रश्न सोडविण्याची हमी दिली तरच आम्ही त्यांचे काम करु, असा इशारा राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी दिला.विद्यमान खासदारांनी केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले - अरुणभाई गुजराथीविद्यमान खासदारांनी गेल्या निवडणुकीत जी काही आश्वासने दिली होती. त्यापैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसून, केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले. आता त्यांना थांबा देण्याची वेळ आली असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले. या मेळाव्यात करण खलसे, डॉ.राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, सलीम पटेल, संजय गरुड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सिंहस्थाचे टॉनीक घेवून फुगलेला फुगा फोडून काढा - हेमलता पाटीलजिल्ह्यातील एक मंत्री नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे टॉनीक घेवून, फुगला असून त्यांचा अहंकार आपल्याला या निवडणुकीत फोडायचा असल्याचे आवाहन कॉँग्रेसच्या प्रभारी हेमलता पाटील यांनी या मेळाव्यात केले.त्यांची सत्तेची मस्ती आता जिरवण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला अर्जरावेर लोकसभा मतदार संघातून कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत दोन प्रतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आधी मेळावा घेण्यात आला. त्यानंतर लेवा भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही रॅली पोहोचल्यावर तेथे प्रचंड गर्दी झाली होती. जिल्हाभरातून वाहने या ठिकाणी आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयसमोरून जाणारी वाहतूक भास्कर मार्केटकडे वळविण्यात आली होती. यावेळी डॉ. पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019