विहीर जलपुनर्भरणाची शंभरी गाठण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 08:46 PM2019-07-20T20:46:30+5:302019-07-20T20:46:36+5:30

चोपडा : तालुक्यातील आदर्श गाव वडगाव बुद्रूक हे नेहमीच विधायक उपक्रमांसाठी पुढे राहिलेले आहे. वडगावच्या माजी सरपंच विजया पाटील ...

Resolution of reaching 100 percent of the water repository | विहीर जलपुनर्भरणाची शंभरी गाठण्याचा संकल्प

विहीर जलपुनर्भरणाची शंभरी गाठण्याचा संकल्प

Next



चोपडा : तालुक्यातील आदर्श गाव वडगाव बुद्रूक हे नेहमीच विधायक उपक्रमांसाठी पुढे राहिलेले आहे. वडगावच्या माजी सरपंच विजया पाटील यांच्या नेतृत्वात गावाला राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे आदर्शग्राम, निर्मलग्राम, वनश्रीसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या गावातील काही ग्रामपंचायत सदस्यांनी जलसंकटावर मात करण्यासाठी विहीर पुनर्भरणाचे काम स्वखर्चाने सुरू केले. या प्रयोगांची शंभरी गाठण्याचे त्यांनी ल्लछरविले आहे.
जलपुनर्भरण काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य दिनकर रामसिंग पाटील, जगदीश लक्ष्मण पाटील, भुजंगराव रामराव गोरगावलेकर, अरविंद लक्ष्मण पाटील, सुनिल भास्कर पाटील, दिलीप भाऊराव पाटील,माजी सरपंच दीपक सुरेश पाटील, अमित जाखेटे, धनराज विनायक पाटील यांनी एकत्र येत स्वखर्चाने इतर सहका-यांसह सांघिकपणे जलपुनर्भरणाचा अत्यंत अनुकरणीय प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
तापी नदीवरील हतनूर धरणातील पुराचे पाणी वाहून जाण्यापेक्षा कालव्याद्वारा आवर्तन सोडण्याची मागणी केली. तसेच ते पाणी भास्कर रामा पाटील यांच्या शेतातील पाट चारीतून दाजभाऊ पाटील व अरुण राजमल जाखेटे यांच्या विहिरीत उतरवले आहे. अशाच पद्धतीने पाटचारीलगत शिवारातील उर्वरित विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गावशिवारातून जाणा-या नाल्यात पाणी जिरवून भूजलपातळीत वाढ होण्यास त्यांनी हातभार लावला आहे.
या उपक्रमाचे मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील, माजी सरपंच गोकुळ पाटील, माजी सरपंच विजया पाटील, सूगिरणीचे व्हॉ.चेअरमन प्रभाकर पाटील, प्रा.संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Web Title: Resolution of reaching 100 percent of the water repository

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.