बारी समाजातील कुटुंब गणनेचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST2021-01-04T04:13:57+5:302021-01-04T04:13:57+5:30

जळगाव : समस्त बारी पंच मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत पंच मंडळातील रिक्त पदांची नियुक्ती करण्यासह समाजातील कुटुंब गणनेचा ठराव ...

Resolution of the family census in the Bari community | बारी समाजातील कुटुंब गणनेचा ठराव

बारी समाजातील कुटुंब गणनेचा ठराव

जळगाव : समस्त बारी पंच मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत पंच मंडळातील रिक्त पदांची नियुक्ती करण्यासह समाजातील कुटुंब गणनेचा ठराव एकमताने समंत करण्यात आला.

सभेची सुरूवात बारी समाजाचे संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यानंतर मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी जळगावातील बारी समाज एकत्र करणे, प्रभागनिहाय समित्या नियुक्त करणे, पंच मंडळातील रिक्त पदांवर नियुक्त्या करणे, समाजाची कुटुंब गणना करणे आदी विषयांवर चर्चा होऊन, हे ठराव मंजुर करण्यात आले. तसेच समाजातील व्यक्तींच्या समस्या, अभिप्राय यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी पंच मंडळाचे लतिश बारी, विजय बारी, सुनील बारी, नितीन बारी, बालमुकुंद बारी, महेंद्र बारी, अरूण बारी, मयूर बारी, हर्षल बारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Resolution of the family census in the Bari community