साकळी येथे वीज कर्मचाऱ्यांकडून तक्रारींचे निरसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:28+5:302021-07-21T04:13:28+5:30

साकळी येथील मजुमदार चौक भागातील वीज तारांना लावलेले ताण खराब झाल्यामुळे ते ताण तारांपासून निघून गेले होते. त्यामुळे या ...

Resolution of complaints from power workers at Sakli | साकळी येथे वीज कर्मचाऱ्यांकडून तक्रारींचे निरसन

साकळी येथे वीज कर्मचाऱ्यांकडून तक्रारींचे निरसन

साकळी येथील मजुमदार चौक भागातील वीज तारांना लावलेले ताण खराब झाल्यामुळे ते ताण तारांपासून निघून गेले होते. त्यामुळे या भागातील वीज तारा मोठ्या प्रमाणात सैल झालेल्या होत्या. नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाकडे तोंडी तक्रार करत या गंभीर समस्येबाबत माहिती देत तत्काळ समस्या सोडविण्याबाबत विनंती केली.

दरम्यान, वीज वितरण कार्यालयाचे साहाय्यक अभियंता डी.डी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी खेमकांत सोनवणे, नितीन पाटील, अय्युब तडवी, दीपक चौधरी यांच्या टीमने तत्काळ तक्रारीच्या ठिकाणी येऊन वीज तारांना तीन ठिकाणी प्लास्टिकचे ताण बांधले व एका कमजोर झालेल्या वीज तारेस बांधले. या वीज कर्मचाऱ्यांनी भर उन्हात तारांचे काम केले हे विशेष आहे.

या वेळी कैलास बोरसे, रवींद्र पारिस्कर, अंबादास वाणी, मंगेश मुजुमदार, रवींद्र बोरसे, राजू चोपडे यांच्यासह वीज कर्मचाऱ्यांना उंचावर उभे राहण्यासाठी साकळी येथील हाजी कय्युमशेठ व त्यांचे लहान बंधू कलिमशेठ आणि सलीमभाई यांच्या मालकीचे वाहन सलीमभाई यांनी तत्काळ उपलब्ध करून देत सर्व नागरिकांनी वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. वीज तारा लोंबकळण्याची समस्या दूर झाली.

Web Title: Resolution of complaints from power workers at Sakli