दारु दुकानांना विरोध, 2 जूनला भुसावळला ‘रेल रोको’
By Admin | Updated: May 15, 2017 17:44 IST2017-05-15T17:44:11+5:302017-05-15T17:44:11+5:30
प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांनी पत्रकार परीषदेत दिला़

दारु दुकानांना विरोध, 2 जूनला भुसावळला ‘रेल रोको’
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 15 - शहरातील मद्य दुकानांना आपला विरोध कायम राहणार असून या मागणीसाठी 2 जून रोजी शहरात ‘रेल रोको’ आंदोलन तसेच प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांनी पत्रकार परीषदेत दिला़ आमदार संजय सावकारे यांच्या कार्यपद्धत्तीवर त्यांनी टिका केली़
त्या म्हणाल्या की, दारु दुकाने वाचविण्यासाठी आमदारांनी महसूलमंत्र्यांना पत्र दिल्याची बाब संतापजनक असून त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आह़े
माजी नगरसेवक जगन सोनवणे, निंभोरा ग्रा़पं़सदस्य वनिता सुरवाडे, हरीष सुरवाडे यांची प्रसंगी उपस्थिती होती़