बसमधील प्रवासी बालंबाल बचावल़े़
By Admin | Updated: October 3, 2015 00:06 IST2015-10-03T00:06:55+5:302015-10-03T00:06:55+5:30
साक्री : मध्य प्रदेशच्या बसला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली.

बसमधील प्रवासी बालंबाल बचावल़े़
साक्री : मध्य प्रदेशच्या बसला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली.
मध्य प्रदेश ट्रान्सपोर्ट कंपनीची सुरत-इंदूर ही बस प्रवासी घेऊन इंदूरकडे जात होती. साक्री येथील बसस्थानकातून ही बस बाहेर पडत असताना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दररोजच्या वेळेनुसार ही बस साक्री बसस्थानकावर आली असताना प्रवासी घेऊन बाहेर पडली. बस प्रवाशांनी पूर्ण भरली होती. या बसच्या टपावर एक सायकल ठेवण्यात आली होती़ या सायकलला वरून गेलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाला़ तेव्हा तारांमध्ये घर्षण होऊन मोठा जाळ निर्माण झाला. सुदैवाने विजेचा प्रवाह खंडित झाला़ त्यामुळे बसमध्ये वीज प्रवाह उतरला नाही. अन्यथा, बसमधील सर्वच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.