जिल्हा पोलीस दलात फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:08+5:302021-08-26T04:19:08+5:30

शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली असून, त्यांच्या जागी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे ...

Reshuffle in the district police force | जिल्हा पोलीस दलात फेरबदल

जिल्हा पोलीस दलात फेरबदल

शनी पेठचे निरीक्षक विठ्ठल ससे यांची सुरक्षा शाखेत बदली झाली असून, त्यांच्या जागी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांना नियुक्त करण्यात आले आहे. नाशिक येथून नव्याने दाखल झालेले कांतीलाल पाटील यांना चाळीसगाव शहरला नियुक्ती देण्यात आली आहे, तर आठवडाभरापूर्वीच रामानंदला नियुक्ती झालेले किरण शिंदे यांना जामनेर पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षकांचे वाचक असलेले सिद्धेश्वर आखेगावकर यांना फैजपूर, तर अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक जयेश खलाणे यांना मारवडचे प्रभारी बनविण्यात आले आहे. चार महिन्यांपूर्वीच पहूरला नियुक्ती दिलेले सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक यांना भुसावळ शहर वाहतूक शाखेचे प्रभारी बनविण्यात आले आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेचे देवीदास कुनगर यांना चोपडा ग्रामीणला नियुक्ती देण्यात आली आहे.

Web Title: Reshuffle in the district police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.