संचालकांना पाठविला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:14+5:302021-09-02T04:36:14+5:30
चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल हा मंगळवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी मुंबई ...

संचालकांना पाठविला अहवाल
चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल हा मंगळवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग संचालक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ज्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे, अशा घरातील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था ही ए.बी.हायस्कूल येथे केली असल्याचेही त्यात नमूद आहे.
- असे आहे नुकसान
- चाळीसगाव
बाधित गावांची संख्या : ३२
मनुष्यहानी : ०१
लहान पशू (मृत्यू) : १५५
मोठी पशू (मृत्यू) : ५०६
कमी नुकसान झालेली घरे : ६१७
मोठे नुकसान झालेली घरे : २०
किती दुकानांचे नुकसान : ३००
============
- पाचोरा
बाधित गावांची संख्या : ०४
कमी नुकसान झालेली घरे : ०६
मोठे नुकसान झालेली घरे : १८
===========
- भडगाव
बाधित गावांची संख्या : ०२
कमी नुकसान झालेली घरे : १४