दलित वस्ती योजनेप्रकरणी कारवाईचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:57+5:302021-08-21T04:21:57+5:30
रावेर : दलित वस्ती सुधार योजनेच्या ई-निविदा पात्र नसताना मंजूर केल्याने ७२ ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करा, ...

दलित वस्ती योजनेप्रकरणी कारवाईचा अहवाल
रावेर : दलित वस्ती सुधार योजनेच्या ई-निविदा पात्र नसताना मंजूर केल्याने ७२ ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करा, असा अहवाल जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलाकर रणदिवे, उपकार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे व समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग यांच्या चौकशी पथकाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सादर केला आहे.
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तालुक्यातील ३५ पैकी कळमोदा ग्रा.पं.च्या तीन कामांची ई-निविदा प्रक्रिया पात्र ठरली आहे. उर्वरित ३४ ग्रा.पं.च्या ७२ कामांची ३ कोटी ३५ लाख ८५ हजार रुपयांच्या कामांच्या ई-निविदा प्रक्रियेतील नोटिसीत नमूद केलेल्या अटी-शर्थीनुसार संकेत स्थळावर निर्देशित केलेल्या माहितीप्रमाणे तांत्रिक लिफाफ्यात आढळून आल्या नाही, असा अहवाल डॉ. आशिया यांच्याकडे सादर केला आहे. जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी गौरखेडा ग्रा.पं.च्या शौचालयाच्या कामाच्या ई-निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने दलित वस्ती सुधार योजनेच्या ई-टेंडर प्रक्रियेची व विकास कामांची चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी केली होती.