शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

अतिक्रमण काढल्याने रस्ता झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:27 IST

अमळनेर : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे घेतला निर्णय, दगडी दरवाजाच्या सुरक्षेवर लक्ष

अमळनेर : दगडी दरवाजाकडील वाहतूक धोक्याची झाल्याने गणपती विसर्जन करण्यास अतिक्रमण अडथळा ठरत होते. त्यामुळे तहसीलदार, पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने गांधलीपुरा पुलकडे जाणारा मार्ग व सुभाष चौक ते बालेमिया मशिदीपर्यंतच्या रस्त्याचे अतिक्रमण ५ रोजी काढण्यात आले.गेल्या काही दिवसांपूर्वी भिजपावसामुळे ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने धुळे-चोपडा राज्य मार्गावरून दरवाजाकडून होणारी वाहतूक धोक्याची असून पुरातत्व विभागाने वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचे पत्रही दिले आहे. त्यामुळे ही वाहतूक सुभाष चौक व गांधलीपुरा पुलाकडून वळवणे अनिवार्य होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अनेक मंडळांची आरती दगडी दरवाजाजवळ होत असल्याने बँड, ढोल, ताशे वाजवणेदेखील जोखमीचे असून मिरवणूक मार्ग बदलणे गरजेचे असल्याचा मुद्दा शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. नगरपालिका पथक व जेसीबी मशीन घेऊन गांधलीपुरा भागातील पुलाकडे जाणा-या मार्गावरील ५ ते 6 घरे, एक सामाजिक मंदिर, झोपड्या आदी अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या कारवाईमुळे येथील रस्ता मोकळा झाला आहे.उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, संजय चौधरी, युवराज चव्हाण, संतोष बि-हाडे, राधेश्याम अग्रवाल, नगरालिका व पोलीस कर्मचारी शरद पाटिल, हितेश चिंचोरे, दीपक माळी, तलाठी पुरुषोत्तम पाटील, स्वप्नील कुलकर्णी, हर्ष मोरे, प्रथमेश पिंगळे, ोलीस पाटील भागवत पाटील यांचे सहकार्य लाभले.