मरणाचे स्मरण व्हावे.. हरिभक्तीशी सादर व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:33 PM2019-09-10T12:33:27+5:302019-09-10T12:34:50+5:30

भगवान गोपाळकृष्णाच्या अवतार समाप्तीनंगर पांडवांनी, आपल्या नातवास म्हणजे परिक्षित यास राज्याभिषेक केला अन पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणास निघून गेले. अहंकाराच्या ...

Remember to die .. be presented with Haribhakti ... | मरणाचे स्मरण व्हावे.. हरिभक्तीशी सादर व्हावे...

मरणाचे स्मरण व्हावे.. हरिभक्तीशी सादर व्हावे...

Next

भगवान गोपाळकृष्णाच्या अवतार समाप्तीनंगर पांडवांनी, आपल्या नातवास म्हणजे परिक्षित यास राज्याभिषेक केला अन पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणास निघून गेले. अहंकाराच्या भरात राजा परिक्षीतीने शमिक ऋषींच्या गळ्यात मृत सर्प टाकून अपमान केला. शमिकपुत्र शृंगीने, राजा परिक्षितीस शाप दिला. ‘ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सपर्क टाकला असेल, त्यास आज पासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा भुजंग (सर्प) दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल.
राजा परिक्षितास शापवाणी कळाली. सात दिवसावर मृत्यू येऊन ठेपलेला. राजा परिक्षित घाबरला होता. राजा परिक्षितीस वैराग्य प्राप्त झाले. मुलाच्या स्वाधीन राज्य कारभार सोपवला.
त्याच सुमारास, शुकदेव स्वामींनी आपल्या वडिलांच्या मुखाने नुकतीच भागवत कथा ऐकली होती. कथा श्रवणाने त्यांची चित्तवृत्ती प्रफुल्लीत झाली होती. श्रवणातून आपण जो आनंद घेतला आहे, तो कोणाला तरी भागवत कथा सांगून द्यावा, असे त्यांना वाटत होते. शुकदेव हे भेटेल त्याला विचारता आहे की, ‘मी जो भागवत श्रवणाचा आनंद घेतला आहे, तो कोणी घेणारा आहे का ? मी भगवंताच्या लिला सांगण्यास तयार आहे, ऐकणारा कोणी आहे का ?’
शुकदेव स्वामी भागवत कथा सांगणेस उत्सुक होते, अन् राजा परिक्षिती शाप मिळाल्यामुळे उद्धारासाठी तळमळत होता. दोघांची गंगा घाटावर एक वडाच्या झाडाखाली भेट झाली, तो दिवस होता भाद्रपद शु.नवमी.
शुकदेव स्वामींनी राजा परिक्षिता यास धैर्य दिले अन सांगितले की, ‘राजा घाबरू नको मृत्युला. तू भाग्यवान आहेस की, तुला सात दिवस आधी तुझा मृत्यु कळला. अनेक जीव असे आहेत की, ज्यांना पुढचा क्षण सुद्धा आपला आहे किंवा नाही हे माहित नाही.
सात दिवसाच तुझं आयुष्य म्हणजे खूप मोठा कालावधी आपल्या हातात आहे. या सात दिवसात तुला भागवत कथा सांगतो. मृत्यूचे भय चित्तातून जाईल. तुला शांती मिळेल. शुकदेव स्वामींनी राजा परिक्षिता यास भाद्रपद शु.नवमी ते पौर्णिमा ( ८ सप्टेंबर २०१९ ते १४ सप्टेंबर २०१९) या कालावधीत भागवत कथा सांगितली. या कथा श्रवणाने भगवंताचे नाम चित्तात प्रतिष्ठित (स्थापित) होते म्हणून या भागवत कथा सप्ताहास प्रौष्ठपदी भागवत सप्ताह असे म्हणतात.
- राया उपासनी, निजामपूरकर

Web Title: Remember to die .. be presented with Haribhakti ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.