शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

निकालाचे होणार दूरगामी परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:21 IST

भाजपाने चारही जागा राखल्यास गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट ; ‘विधानसभे’साठी मोठी जबाबदारी, जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीला येईल उर्जितावस्था तर नंदुरबार-धुळे जिल्ह्यात वाढू शकतो आत्मविश्वास

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीचे निकाल तीन दिवसात जाहीर होतील. यंदाच्या अतीशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत निकालाविषयी मोठी अनिश्चितता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. देशात आणि खान्देशात सगळेच पक्ष आणि पदाधिकारी विजयाचे दावे करीत असले तरी खाजगीत मात्र वेगळाच सूर लावला जात आहे. मतदारसंघात वेगवेगळी समीकरणे जुळली असल्याने निकाल वेगळे लागू शकतात, असे आता कार्यकर्तेदेखील बोलू लागले आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. रावेरच्या जागेविषयी भाजप निश्चिंत आहे. दहा वर्षानंतर ‘पंजा’ हे चिन्ह या मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांच्यारुपाने पुन्हा एकदा मतदारांपर्यंत गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीचा प्रभाव निर्माण होईल.जळगावच्या जागेविषयी दोन्ही पक्ष ठामपणे विजयाचा दावा करीत आहे. भाजपमधील उमेदवारीच्या गोंधळामुळे हक्काची जागा भाजप गमावेल, असे चित्र निर्माण झाले होते. गुलाबराव देवकर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार राष्टÑवादी काँग्रेसने मैदानात उतरविल्याने वसंतराव मोरे यांच्याप्रमाणेचे विजयाची पुनरावृत्ती देवकर करतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्या मदतीने ‘युती’ची एकत्रित शक्ती पणाला लावली असल्याचे चित्र मतदारसंघात तयार झाले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनाही या दोन मंत्र्यांनी कामाला लावले. ज्याच्या मतदारसंघात मताधिक्य त्याची उमेदवारी निश्चित हा ‘फंडा’ प्रभावी ठरल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात कितपत तथ्य आहे, हे निकालानंतर कळेल.धुळे आणि नंदुरबारविषयी काँग्रेस पक्ष खूपच आशावादी आहे. ९ पैकी ५ आमदार, दोन विधान परिषद सदस्य, दोन्ही जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, पंचायत समित्या, पालिका त्यासोबतच सुरुपसिंग नाईक, माणिकराव गावीत, अमरीशभाई पटेल, रोहिदास पाटील, पद्माकर वळवी, डी.एस.अहिरे यांच्यासारखे दिग्गज नेते असल्याने काँग्रेस पक्ष ताकदवान दिसत आहे. धुळ्यात राष्टÑवादी काँग्रेसची भक्कम साथ मिळाली असली तरी नंदुरबारात तशी स्थिती नव्हती. अनिल गोटे आणि डॉ.सुहास नटावदकर यांच्या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला होऊ शकेल, असे वातावरण असले तरी प्रत्यक्षातील स्थिती पुन्हा एकदा वेगळी असू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.नंदुरबारात डॉ.विजयकुमार गावीत यांनी एकहाती ही निवडणूक पेलली. पालकमंत्री जयकुमार रावल यांची साथ त्यांना लाभली. नटावदकर यांची बंडखोरी आणि शिवसेनेची नाराजी याचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने त्यांनी रणनिती आखली. धुळ्यात कुणाल पाटील यांच्यासारखा तरुण आमदार आणि अनिल गोटे या स्वपक्षीय बंडखोरामुळे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे होते. ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यात याठिकाणी लक्ष घातले अशी चर्चा आहे, त्याचा काय परिणाम होतो, तेदेखील तीन दिवसात कळेल.केंद्रात कोणते सरकार येते, यावर महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. युती-आघाडी, पक्षांतरे हे सगळे पुढील काळात निश्चित होईल.खान्देशातील चारही जागा प्रथमच भाजपने गेल्यावेळी जिंकल्या. आता जर या जागा कायम राखल्या तर उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. कदाचित बहुप्रतिक्षित जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांना मिळू शकते. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडील अधिकारामध्ये वाढ होऊ शकते. विजय झाल्यास जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, एकनाथराव खडसे यांच्या कामगिरीची पक्ष दखल घेईल. काँग्रेस-राष्टÑवादीच्यादृष्टीने ही अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव