बहुतांश मेडिकलवर रेमडेसीवीरची किंमत १२०० रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:39+5:302021-03-27T04:16:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गरजू गरीब रुग्णांना रेमडेसीवीर हे कोरोना उपचारात महत्त्वाचे इंजेक्शन तातडीने व कमी किमतीत ...

बहुतांश मेडिकलवर रेमडेसीवीरची किंमत १२०० रूपये
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गरजू गरीब रुग्णांना रेमडेसीवीर हे कोरोना उपचारात महत्त्वाचे इंजेक्शन तातडीने व कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा नुकताचा केमिस्ट असोसिएशनने निर्णय घेतला आहे. याची शहरातील काही मेडिकलवर पडताळणी केली असता, हे इंजेक्शन ठरविल्याप्रमाणे बहुतांश मेडिकलवर १२०० रूुपयात व डॉक्टरांच्या परवानगीनुसारच उपलब्ध होत असल्याचे या पाहणीत समोर आले. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, काही रुग्णालयात याचे दर अधिक लावले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
अनुभव असे
१ ओंकार नगरातील एका मेडिकलवर सायंकाळी चौकशी केली असता इंजेक्शन १२०० रूपयात असल्याचे मेडिकलवरील तरूणाने सांगितले. अन्य ठिकाणची विचारपूस केल्यास. सर्वत्र १२०० रूपयातच हे इंजेक्शन मिळेल असे सांगण्यात आले.
२ आर. आर. शाळे समोरील गांधी नगरातील एका मेडिकलवर विचारणा केली असता, त्यांनी आधी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन विचारले. नंतर किंमत विचारली असता. १२०० रूपयांपर्यंत उपलब्ध होईल, मात्र,प्रिस्क्रिप्शन लागेल असे मेडिकलवाल्यांनी सांगितले.
३ शेजारी अन्य एका मेडिकलवर विचारणा केली असता, इंजेक्शन नसल्याचे त्यांनी सांगितले.
४ एका मोठ्या रुग्णालयाच्या मेडिकलवर विचारणा केली असता, इंजेक्शन १२०० रूपयाचे असल्याचे सांगण्यात आले.
५ शासकीय रुग्णालयाच्या अगदी समोर असलेल्या मेडिकलवर विचारणा केली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनची मागणी करण्यात आली. किमत १२०० रूपये सांगण्यात आली.
६ आकाशवाणी चौकातील दोन मोठ्या ंरुग्णालयांमध्ये तपासणी केली असता या ठिकाणीही १२०० किमंत सांगण्यात आली.
तक्रारी मात्र कायम
काही मेडिकलवर किमंत १२०० रूुपये सांगितली जात असली तरी पंधराशे रुपयांपर्यंत आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहे. काही रुग्णालयात अधिकचे दर लावले जात आहेत. अशा काही तक्रारी समोर येत आहे.
कोट
रेमडेसीवरच्या ज्यादा दराबाबत तक्रारी आल्यास आम्ही त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवित असतो. डॉॅक्टरांच्या पिस्क्रीप्शनने रुग्णांना ते मेडिकलवर उपलब्ध होतात. ते कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा केमिस्ट संघटनेने निर्णय घेतला आहे. - सुनील भंगाळे, अध्यक्ष केमिस्ट संघटना