शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 20:06 IST

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला.

ठळक मुद्देतापमानात झाली घसरणपुढील आठवड्यात पावसाचा अंदाजउन्हाळी कापसाची लागवड सुरु

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२२ - गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला. वातावरणात आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारा लागल्या.दुपारी १२ नंतर पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला. दरम्यान, पुढील आठवड्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.तापमानात चढ-उतार सुरुशुक्रवारपासून तापमानात चढउतार होत आहे. या दिवशी कमाल तापमान ४३.२ तर किमान तापमान २७.८ नोंदविण्यात आले होते. शनिवारी त्यात वाढ होऊन अनुक्रमे ४५.० व २८.० झाले होते. रविवारी २ अंशानी घसरण होऊन ४३.२ व २७.८ पर्यंत नोंद झाली होती. सोमवारी पुन्हा तापमान ४५.० पर्यंत पोहचले होते. मंगळवारी ४४.२ तापमानाची नोंद करण्यात आली.११ वाजेपर्यंत ढगाळ वातावरणमंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरणहोते.पावसाच्यासरीबरसतातकीकाय? अशी स्थिती होती. मात्र ११ वाजेपासून पुन्हा तापमानात वाढ झाली. दुपारी ४४.२ तापमानाची नोंद झाली. आर्द्रता ६५ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने प्रचंड उकाडा होऊन घामाच्या धारा लागल्याहोत्या.आगामी आठवडा तापमान कायममंगळवारी ढगाळ वातावरण असले तरी आठवडाभर कमाल व किमान तापमान कायम राहणार आहे. त्यामुळे किमान सात ते आठ दिवस जळगावकरांना प्रचंड उकाडा त्रस्त करणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात पावसाचे संकेत आहेत.ताशी २४ किमी वेगाने वारेमंगळवारी आंतरदेशीय वाऱ्यांचा वेग हा एका तासाला २० ते २४ किलोमिटर इतका होता. त्यामुळे तापमानातील दाहकता काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र दुपारनंतर रस्त्यावरील रहदारी नेहमीप्रमाणे कमी झाली होती.पावसासाठी अजून आठवडाभर प्रतीक्षाउत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तसेच राज्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली नाही. कर्नाटक, मराठवाडा, छत्तीसगड असा तयार झालेला विक्षोभचा पट्टा आठ दिवसात जळगावकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात आठवड्याभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.उन्हाळी कपाशीची लागवड सुरुआगामी आठवड्यात पावसाचे संकेत असल्याने पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकºयांनी उन्हाळी कापस व भुईमुगाची लागवड सुरु केली आहे. शेतातील आंतरमशागतीला वेग आला आहे. शेतात नागरटी, कचरा वेचणी ही कामे सुरु झाली आहे. शेतकºयांनी देखील बियाणे खरेदी आतापासून सुरु केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव