‘अपनो ने ठुकराया, इन्सानियतने अपनाया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:19 AM2020-07-23T00:19:56+5:302020-07-23T00:21:41+5:30

‘अपनो ने ठुकराया इन्सानियत ने अपना अपनाया’, असा प्रत्यय आला, इन्सानियत की मिसाल ठेवत नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दोघी मुलींना स्वत:च्या घरात आपल्या मुलांप्रमाणे आश्रय देत त्यांची सेवा केली.

‘Rejected by yours, adopted by humanity’ | ‘अपनो ने ठुकराया, इन्सानियतने अपनाया’

‘अपनो ने ठुकराया, इन्सानियतने अपनाया’

googlenewsNext
ठळक मुद्देहतनूर येथील आहेत त्या मुली‘त्या’ मुलींना अखेर पिंटू कोठारी यांचा ‘इन्सानियत का हात’

वासेफ पटेल/उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील हतनूर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सुदैवाने त्या कुटुंबातील अनुक्रमे ८ व १० या दोन मुलींचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. प्रशासनाने कुटुंबाच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्या मुलींची काळजी घेण्यासाठी सुचवले असता कुणीही नातेवाईकांनी त्या मुलींची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. ‘अपनो ने ठुकराया इन्सानियत ने अपना अपनाया’, असा प्रत्यय आला, इन्सानियत की मिसाल ठेवत नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दोघी मुलींना स्वत:च्या घरात आपल्या मुलांप्रमाणे आश्रय देत त्यांची सेवा केली.
हतनूर येथील क्वारंटाईन असलेल्या १० जणांच्या कुटुंबातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर दोन मुलींचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबातील आठपैकी काहींना उपचारासाठी डॉ.आंबेडकर वसतिगृह कोविड सेंटरमध्ये, तर काहींना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या कुटुंबातील दोन्ही मुली निगेटिव्ह असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यास हतनूर गावातील नातेवाईक, गावकरी आणि मित्रपरिवार यांनी कोरोना ऐकताच मनात धडकी घेत सांभाळण्यास नकार दिला. निगेटिव्ह मुलींना कोठे ठेवावे, असा प्रश्न प्रशासनापुढे ठाकला.
तलाठी एम.एल.रत्नानी यांनी नगरसेवक पिंटू कोठारी यांना ही बाब सांगितली. कोठारी हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे त्यांनी त्वरित चिंता करू नका, मुलींना माझ्या घरी पाठवून द्या.कोठारी यांच्या निवासस्थानासमोर बांधलेल्या नवीन घरात या दोन्ही मुलींची व्यवस्था करण्यात आली. त्यांची करमणूक व्हावी म्हणून कोठारेंनी त्यादिवशी नवीन टीव्ही खरेदी करून बसवला. मुलींना अभ्यासासाठी वह्या-पुस्तके, खेळणी आणून दिली. देखरेखीसाठी एका महिलेची नियुक्ती केली. याशिवाय दररोज त्यांची विचारपूस कोठारी दाम्पत्यांनी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वागणूक दिली. यानिमित्ताने अपनोने ठुकराया इन्सानियतने अपना या असा प्रत्यय दिसून आला.

Web Title: ‘Rejected by yours, adopted by humanity’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.