शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वाकडीतील पीडित मुलांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:20 AM

चारपैकी दोन मुले जळगावी बालनिरीक्षणगृहात, उर्वरित दोघांचेही लवकरच

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकडीतील पीडित कुटुंबियांतील मुलांसाठी जिल्हा बालकल्याण समिती पुढे सरसावली असून, शैक्षणिक जबाबदारीसह या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ठामपणे उभी राहिली आहे. शनिवारी समितीच्या सदस्यांनी वाकडीत या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. पीडित मुलांसह त्यांचा अल्पवयीन भाऊ व बहिण यांना घेऊन जळगाव येथील बालनिरीक्षकगृहात दाखल केले असून, या पीडित कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे.वाकडी येथे गेल्या महिन्यात विहिरीत पोहल्याच्या शुल्लक कारणावरुन मातंग समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार यांना अटक करण्यात आली आहे, तर अजित तडवी व शकनूर तडवी यांना गावबंदीच्या शर्तीवर जामीन मिळाला आहे. याठिकाणी अनेक मंत्री, आमदार व सामाजिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन काहीनी तुटपुंजी मदत देऊन आपल्या पद्धतीने सोयीचे राजकारण केल्याचे दिसून आले आहे.या समितीचा मूळ उद्देश एकच की, अनाथ, पीडित, गोरगरीब मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याचा आहे. या हेतूने जिल्हा बालकल्याण समितीने संवेदनशील मन जपून वाकडीतील पीडित कुटुंबांच्या घरी शनिवारी नितीन विसपुते व डॉ.शैलेजा चव्हाण या सदस्यांनी भेटी देऊन या कुटुंबांची व्यथा जाणून घेतली. या पीडित मुलांसह त्यांच्या कुटुंंबातील अल्पवयीन भाऊ-बहिण यांच्या शिक्षणासह त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.शनिवारी दोन पीडित मुलांना या सदस्यांनी वाकडी गावातून सोबत घेऊन जळगावातील बालनिरीक्षकगृहात दाखल केले आहे. अशी एकूण पीडित चार मुले असून, यांच्यासह १८ वर्षांखालील भाऊ-बहिण यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन ते तीन दिवसात राहिलेले पीडित दोन मुलांनादेखील निरीक्षणगृहात दाखल केले जाणार आहे. आज एक कुटुंब शेतात गेलेले होते. यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे या सदस्यांच्या संपर्कात आहेत.व्यावसायिक शिक्षण मुंबईतया पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींचे अठरा वर्षांपर्यंत शिक्षण जळगाव येथे होईल. त्यानंतर अठरा ते एकविस वर्षापर्यंत पुढील शिक्षण हे मुंबईत दिले जाणार आहे. या काळात या मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे.पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींची काळजी, संरक्षण, शिक्षण देण्याच्या दृष्टीने समिती कार्य करीत आहे. या पीडित कुटुंबातील अठरा वर्षांखालील मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी समितीने निर्णय घेतला आहे.-नितीन विसपुते, सदस्य, जिल्हा बालकल्याण समिती, जळगाव

टॅग्स :Crimeगुन्हाJamnerजामनेर