उद्यापासून न्यायालयाचे कामकाज नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:44+5:302021-02-05T05:56:44+5:30

आदर्शनगरातून दुचाकी लांबविली जळगाव : आदर्शनगरील आराधना अपार्टंमेंटमधून श्याम आनंदा ठाकूर यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ...

Regular court proceedings from tomorrow | उद्यापासून न्यायालयाचे कामकाज नियमित

उद्यापासून न्यायालयाचे कामकाज नियमित

आदर्शनगरातून दुचाकी लांबविली

जळगाव : आदर्शनगरील आराधना अपार्टंमेंटमधून श्याम आनंदा ठाकूर यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.बी.३४६७) चोरट्यांनी लांबविल्याची घटना २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

सायकलस्वाराचा मोबाईल हिसकला

जळगाव : पांडे चौकातून सायकलीने जात असलेल्या उदय विनायक बुवा (वय ३५ मूळ रा. वरणगाव ता. भुसावळ ह.मु. रथचौक) या तरुणाचा १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी लांबविल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उदय याने तिघांचा सायकलने पाठलाग केला परंतु तिघे चोरटे पसार झाले होते. तपास उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.

आसोदा येथील तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव : तालुक्यातील आसोदा येथील स्वप्निल जानकीराम चौधरी (वय २९) या तरुणाची दुचाकी (क्र.एम.एच १९ बी.ई १९३५) ऑर्किड हॉस्पिटलसमोरून लांबविण्यात आली आहे. याप्रकरणी शनिवारी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Web Title: Regular court proceedings from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.