चांगले रस्ते कामे करण्यासाठी आमदारांकडून अधिका:यांना तंबी

By Admin | Updated: May 10, 2017 16:00 IST2017-05-10T16:00:27+5:302017-05-10T16:00:27+5:30

आमदार सोनवणे यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता चहार्डी येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर रस्त्यावर डांबर कार्पेट थर टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Regarding the officials of the MLAs for better road work | चांगले रस्ते कामे करण्यासाठी आमदारांकडून अधिका:यांना तंबी

चांगले रस्ते कामे करण्यासाठी आमदारांकडून अधिका:यांना तंबी

 चोपडा,दि.10- तालुक्यातील चहार्डी ते अकुलखेडा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दज्रेदार व चांगले व्हावे या दृष्टीने अधिका:यांनी नियोजन करावे अशी सूचना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना दिली.

आमदार सोनवणे यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता चहार्डी येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर रस्त्यावर डांबर कार्पेट थर टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच उषाबाई पाटील, दीपक जोहरी, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, पंचायत समिती उपसभापती एम व्ही पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, माजी सदस्य अशोक पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्यता संगीता कोळी, ग्रामपंचायत सदस्या प्रमिलाबाई पाटील, विनायक
संतोष पाटील, डॉ अनिल पाटील, उपसरपंच प्रशांत पाटील, सुधाकर पाटील, कंत्राटदार कौस्तुभ तिवारी, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता चव्हाण , नगरसेवक महेश पवार, किशोर चौधरी, आबा देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Regarding the officials of the MLAs for better road work