गिरणेचे आवर्तन सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:37 IST2019-05-09T17:37:47+5:302019-05-09T17:37:53+5:30
दिलासा : पाणी टंचाईची झळ कमी होणार

गिरणेचे आवर्तन सुटले
खेडगाव, ता. भडगाव: गिरणा धरणातुन ९ रोजी सकाळी ६ वाजता पिण्यासाठी म्हणुन आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे अनेक गावांना लाभ मिळणार असून पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार आहे.
सुरवातीला २००० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे, अशी माहिती धरण अभियंता एस.आर. पाटील यांनी दिली.यावर्षीचे हे चौथे आवर्तन आहे. याआधी दिवाळीला, संक्रातीला व होळीला असे तीन आवर्तन सोडण्यात आले.
धरणात ६२९७ दलघफु जलसाठा असुन यात ३२९७ दलघफु इतका जिवंत जलसाठा आहे. या आवर्तनात १३००-१५००दलघफु जलसाठा लागण्याचा अंदाज आहे.दोन महिन्याच्या अंतराने आवर्तन सोडण्यात येत असुन यावेळेस उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव व जळगाव तालुक्यातील गिरणाकाठावरील गावांमधुन पाणी सोडण्याची मागणी होती. यामुळे नियोजनाच्या एक आठवडा आधीच आवर्तन सुटले.