शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यावलमधील सानेगुरुजी विद्यालयातील ‘ती’ शिक्षकेतर कर्मचारी भरती अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 18:46 IST

यावल पालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आलेली शिक्षकेतर भरती रद्द करण्यात यावी व अहवाल पाच दिवसांच्या आत पाठवण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकाºयांना दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची कारवाईपाच दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल पालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आलेली शिक्षकेतर भरती नियमबाह्य व शासनाची परवानगी न घेता केल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी तक्रार माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह इतर सहा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही पदभरती रद्द करण्यात यावी व अहवाल पाच दिवसांच्या आत पाठवण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकाºयांना दिला आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.सूत्रांनुसार, यावल पालिका संचलित साने गुरुजी विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक बेहेडे व सचिव तथा मुख्याध्यापक एस.आर.वाघ यांनी वृत्तपत्रातून शिक्षकेतर भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. ८ मार्च २०१९ रोजी मुलाखती घेऊन व व लागलीच दुसºया दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी तीन कर्मचाºयांना नियुक्ती देऊन हजर करून घेतले होते. ही संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, शेख असलम नवी, पूर्णिमा पालक, रुखमाबाई भालेराव व देवयानी महाजन यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार करून भरती रद्द करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पत्र देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी यावल गटशिक्षणाधिकाºयांना पत्र देऊन सदर या भरतीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सत्यता पडताळणीबाबत चौकशी करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी इजाज शेख यांनी साने गुरुजी विद्यालय यावल येथे २९ एप्रिल २०१९ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली होती व मुख्याध्यापकांंचा खुलासा घेतला होता. त्यानुसार यावल येथील सानेगुरुजी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी भरती ही नियमबाह्य असून त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीही ना हरकत अथवा परवानगी घेतलेली नसल्याचा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविला होता. गटशिक्षणाधिकाºयांच्या अहवालावरून शिक्षण विभागाने ६ जुलै २०१९ च्या पत्रान्वये ही भरती अनधिकृत असल्याचे जिल्हाधिकाºयांना पाठवलेल्या अहवालात नमूद केले होते व या नियुक्तीस खात्याकडून मान्यता देता येणार नाही, असे कळविले होते. गटशिक्षणाधिकाºयांचा अहवाल तसेच शिक्षणाधिकाºयांचे पत्र व तक्रारदार यांची तक्रार याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी ही शिक्षकेतर कर्मचारी पदभरती तत्काळ रद्द करून त्यानुसार केलेल्या कारवाईचा अहवाल पाच दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश यावल येथील मुख्याधिकाºयांना केले आहे. यावर मुख्याधिकारी केव्हा व काय कारवाई करतात याकडे शिक्षण क्षेत्रासह यावलवासीयांचे लक्ष लागले आहे.संबंधितांवर फौजदारी कारवाई होण्यासाठी तक्रार करणारबोगस शिक्षकेतर भरतीबाबत जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी ६ जुलै २०१९ रोजी भरती प्रक्रिया नियमबाह्य असून पदांना मान्यता देता येणार नाही, असे शालेय समिती अध्यक्ष व सचिव असलेले मुख्याध्यापक वाघ यांना लेखी स्वरूपात कळविले होते. असे असूनदेखील मुख्याध्यापक वाघ यांनी नियमबाह्य भरती केलेल्या दोन कर्मचाºयांचे मंजुरीचे प्रस्ताव उपसंचालक शिक्षण विभाग नाशिक यांच्याकडे पाठवलेले आहेत. भरती प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने कळवूनदेखील मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे म्हणजे शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. यामध्ये भरती प्रक्रियेतील कर्मचाºयांनी नोकरीपोटी दिलेले पैसे परत मागू नयेत म्हणून केलेला हा खटाटोप आहे. सदर बाब गंभीर असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून पाठपुरावा करणार आहे.-अतुल पाटील, तक्रारदार (माजी नगराध्यक्ष), यावल 

टॅग्स :Teacherशिक्षकYawalयावल